Maharashtra लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Maharashtra लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात पर्यवेक्षकीय पदांच्या ४८३ जागा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात सहाय्यक वाहतूक अधिक्षक (कनिष्ठ) (२५ जागा), वाहतूक निरीक्षक (कनिष्ठ) (१४८ जागा), लेखाकार (कनिष्ठ) (६३ जागा), भांडार पर्यवेक्षक (कनिष्ठ) (२ जागा), भांडारपाल (कनिष्ठ) (४० जागा), सुरक्षा निरीक्षक (कनिष्ठ) (१२ जागा), सहा.सुरक्षा निरीक्षक (कनिष्ठ) (२२ जागा), आगरक्षक (कनिष्ठ) (१ जागा), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)(कनिष्ठ) (४६ जागा), कनिष्ठ अभियंता (विद्युत)(कनिष्ठ) (७ जागा), सहा.कार्य.अधिक्षक (कनिष्ठ)/तांत्रिक सहाय्यक (कनिष्ठ) (९२ जागा), प्रभारक कनिष्ठ (१० जागा), वरिष्ठ संगणित्र चालक (कनिष्ठ)/विभागीय संगणक पर्यवेक्षक (क.) (१५ जागा) अशा एकूण ४८३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधीत १२ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१७ आहे. अधिक माहिती https://msrtc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेण्टल रिसर्चमध्ये विविध पदांच्या ३ जागा

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेण्टल रिसर्चमध्ये प्रशासकीय अधिकारी (१ जागा), प्रशासकीय सहाय्यक (१ जागा), कनिष्ठ हिंदी भाषांतरकार (१ जागा) अशा एकूण ३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २२ दिवस आहे. अधिक माहिती http://www.tifr.res.in/positions या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एसटी मध्ये महाव्यवस्थापक पदाच्या २ जागा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये (एसटी) महाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) (१ जागा), महाव्यवस्थापक (प्रकल्प) (१ जागा) अशी एकूण २ पदे सरळसेवेने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एमएससी बँकेत अधिकारी पदाच्या ३५ जागा

दी महाराष्ट्र स्टेट कॉ-ऑपरेटीव्ही बँक लिमिटेड मध्ये व्यवस्थापक (५ जागा), सह व्यवस्थापक ( ५ जागा), सहाय्यक व्यवस्थापक (७ जागा), अधिकारी वर्ग-II ( ५ जागा), कनिष्ठ अधिकारी ( १३ जागा) अशा एकूण जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.mscbank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांच्या ७६ जागा

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नगरपरिषद सेवा नगर अभियंता / पर्यवेक्षक (१७ जागा), महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक अभियांत्रिकी सेवा (४ जागा), लेखापरिक्षण व लेखा सेवा सहायक लेखा पर्यवेक्षक/सहायक लेखापाल (२ जागा), अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक सेवा (६ जागा), कर निर्धारण व प्रशासकीय सेवा (३ जागा), लघुटंकलेखक (२ जागा), लिपीक टंकलेखक (४ जागा), स्वच्छता निरिक्षक (९ जागा), वाहनचालक कम ऑपरेटर (७ जागा), सहायक उद्यान पर्यवेक्षक (३ जागा), आरोग्य सहायक /नर्स (२ जागा), गाळणी चालक/प्रयोगशाळा सहायक (३ जागा), पंप ऑपरेटर (१ जागा), तारतंत्री (२ जागा), फायरमन (११ जागा) अशा एकूण ७६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महापारेषणमध्ये निम्नस्तर लिपीक (लेखा) पदाच्या ६२ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत निम्नस्तर लिपीक (लेखा) पदासाठी पुणे झोन (८ जागा), नाशिक झोन (९ जागा), नागपूर झोन (९ जागा), कऱ्हाड झोन (१२ जागा), औरंगाबाद झोन (८ जागा), अमरावती झोन (४ जागा), वाशी झोन (१० जागा), कॉर्पोरेट ऑफिस (२ जागा) अशा एकूण ६२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती www.mahatransco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महापारेषणमध्ये इंजिनिअर पदाच्या २८१ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत डेप्युटी एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर (सिव्हील) (१८ जागा), असिस्टंट इंजिनिअर (ट्रान्स) (१६८ जागा), असिस्टंट इंजिनिअर (टेलिकॉम) (२५ जागा), असिस्टंट इंजिनिअर (सिव्हील) (७० जागा) अशा एकूण २८१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती www.mahatransco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कृषी आयुक्तालयाच्या विविध विभागात कृषी सेवक पदाच्या 730 जागा

कृषी आयुक्तालच्या अधिनस्त विभागीय कार्यालयाअंतर्गत गट-क संवर्गातील कृषी सेवकांची पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पुणे - 156 पदे, ठाणे - 181 पदे, नाशिक - 31 पदे, कोल्हापूर - ८६ पदे, औरंगाबाद - १०७ पदे, लातूर - २२ पदे, अमरावती - ९ पदे, नागपूर - १३८ पदे अशी विभागनिहाय पदसंख्या आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १२ जानेवारी २०१६ आहे. अधिक माहिती www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये उपव्यवस्थापक व सहायक व्यवस्थापक पदाच्या ५ जागा

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) मध्ये उपव्यवस्थापक (०१जागा) आणि सहायक व्यवस्थापक (४ जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०१५ आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघात प्रशासन अधिकारी व लेखा व वित्त अधिकारी पदाची भरती

महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित, (महाटेक्स), मुंबई येथे प्रशासन अधिकारी (०१जागा) व लेखा व वित्त अधिकारी (०१जागा) या दोन पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २८ डिसेंबर २०१५ आहे. अधिक माहितीसाठी दै.लोकसत्ताचा दि. २६ नोव्हेंबर २०१५ रोजीचा अंक पहावा.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात विविध पदांच्या 4 जागा

भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात प्रोफेसर (पीएसआर) (1 पद), असोसिएट प्रोफेसर (पीएमआर) (1 पद), असस्टंटस प्रोफेसर (पीएमआर) (2 पदे) एक वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येत आहेत. दि. 1 डिसेंबर 2015 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहिती www.aiipmr.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत विविध पदाच्या 54 जागा

आरोग्य सेवा संचालनालय, ‘प्रकल्प प्रेरणा’ शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पद्धतीने औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, अकोला, यवतमाळ व वाशिम या नऊ जिल्हांमध्ये प्रोग्राम ऑफिसर (मानसोपचार तज्ज्ञ) (9 जागा), चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ (9 जागा), मनोविकृती सामाजिक कार्यकता (9 जागा), मनोविकृती परिचारिका (9 जागा), सामाजिक परिचारिका (9 जागा), असिस्टंट (9 जागा) या पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन 15 ऑक्टोबर 2015 रोजी करण्यात आले आहे. सामाजिक परिचारिका व असिस्टंट या पदासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज 12 ऑक्टोबर 2015 पर्यंत करावा. मुलाखत संबंधीत जिल्ह्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयात होईल.

पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, (WSSO) बेलापूर, नवी मुंबई येथे विविध पदाच्या 14 जागा

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, (WSSO) बेलापूर, नवी मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने संनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार (1 जागा), माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार (1 जागा), मन्युष्यबळ विकास सल्लागार (1 जागा), विभागीय समन्वयक (4 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), समन्वयक (पाणी गुणवत्ता) (1 जागा), अभियंत्रिकी सल्लागार (सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन) (1 जागा), अभियंत्रिकी सल्लागार (पाणी गुणवत्ता) (1 जागा), सहा. संनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार (1 जागा), सहा. मन्युष्यबळ विकास सल्लागार (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स 5 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://water.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बार्टीमध्ये विविध पदांच्या 36 जागा

डॅा. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या विभागीय व जिल्हास्तरावर तात्पुरत्या स्वरूपातील मुख्य प्रकल्प संचालक (01), प्रकल्प संचालक (01), वरिष्ठ विधी सल्लागार (01), विधी सल्लागार (08), विभागीय प्रकल्प संचालक (02), सहायक प्रकल्प संचालक (04), जनसंपर्क अधिकारी (03), प्रकल्प अधिकारी (समतादूत प्रकल्प) (16) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. वरिष्ठ विधी सल्लागार, विधी सल्लागार, जनसंपर्क अधिकारी यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर तर बाकी पदासाठी 31 ऑगस्ट 2015 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी https//.barti.maharashtra.gov.in यावर संपर्क साधावा.

बार्टी, पुणे येथे विविध पदाच्या 4 जागा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे कंत्राटी पद्धतीने मुख्य प्रकल्प संचालक (कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी) (1 जागा), वरिष्ठ प्रकल्प संचालक (कौशल्य विकास) (1 जागा), प्रकल्प संचालक (माहिती व तंत्रज्ञान) (1 जागा), प्रकल्प संचालक (विशेष प्रकल्प) (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 14 ऑगस्ट 2015 रोजीच्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधनी, पैठण येथे प्रतिनियुक्तीने विविध पदाच्या 8 जागा

मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधनी, नाथनगर, पैठण जि. औरंगाबाद येथे प्रतिनियुक्त निंबधक तथा सहायक प्राध्यापक वर्ग-1 (1 जागा), सहायक प्राध्यापक वर्ग-1 (6 जागा), कार्यालयीन अधीक्षक/स्टेनोग्राफर वर्ग-3 (1 जागा) ) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर रोजगार कॉलम मध्ये उपलब्ध आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र संरक्षण दलाकरिता वनरक्षक पदाच्या 81 जागा

नागपूर वनवृत्तातील गोंदिया वनविभागाच्या आस्थापनेवरील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र संरक्षण दलाकरिता वनरक्षक (81 जागा) या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती ccfnagpur.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) या संस्थेत वितरक आणि पुस्तक विक्रेता होण्याची संधी

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) या संस्थेत एक सुवर्ण संधी आहे. या संस्थेच्या प्रकाशनाचे अधिकृत वितरक आणि पुस्तक विक्रेता करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. 2500 रुपये सुरक्षा ठेवीच्या आधारावर बेरोजगार युवक युवतींना आकर्षक मानधन दिले जाणार आहे. मागासवर्गीय तरुणांसाठी ही ठेव 2000 रुपये आहे. अधिक माहितीसाठी www.nbtindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे प्रतिवेदक (कनिष्ठ) गट-अ पदाच्या 6 जागा

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे प्रतिवेदक (इंग्रजी) (कनिष्ठ) गट-अ (3 जागा), प्रतिवेदक (हिंदी) (कनिष्ठ) गट-अ (3 जागा), या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 24 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आयकर अपेलण्ट न्यायासनमध्ये खाजगी सचिव पदाच्या 74 जागा

आयकर अपेलण्ट न्यायासनमध्ये वरिष्ठ खाजगी सचिव (50 जागा), खाजगी सचिव (24 जागा) या पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती www.itat.nic.in या संकेतस्थळावर उपल्बध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज