Government Jobs लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Government Jobs लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये अभियंता पदाच्या ५४ जागा

सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम (CRIS) मध्ये ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर (४० जागा), ज्युनिअर नेटवर्क इंजिनीअर (१४ जागा) अशा एकूण ५४ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.cris.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध पदांच्या १४२५३ जागा

महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळात चालक तथा वाहक (कनिष्ठ) (७९२९ जागा), लिपीक-टंकलेखक (कनिष्ठ) (२५४८ जागा), सहाय्यक (कनिष्ठ) (३२९३ जागा), पर्यवेक्षकीय (कनिष्ठ) (४८३ जागा) अशा एकूण १४२५३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ जानेवारी २०१७ पासून सुरु होणार असून अधिक माहिती महामंडळाच्या www.msrtc.gov.inmsrtcexam.in या संकेतस्थळावर दि.७ जानेवारी २०१७ पासून उपलब्ध होईल. तसेच अधिक माहितीसाठी दै.लोकमतचा दि. ५ जानेवारी २०१७ रोजीचा अंक पहावा.

सशस्त्र सीमा दलात विविध पदांच्या ८७२ जागा

केंद्रीय गृह विभागाअंतर्गत सशस्त्र सीमा दलात उप-निरीक्षक (समन्वय) (१६ जागा), सहाय्यक उप-निरीक्षक (समन्वय) (११० जागा), मुख्य कॉन्स्टेबल (समन्वय) (७४६ जागा) अशा एकूण ८७२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात पसिद्ध झाल्यापासून ३० दिवस आहे. अधिक माहितीसाठी दि. ३१ डिसेंबर २०१६ ते ६ जानेवारी २०१७ च्या एम्प्लॉयमेंट न्यूज पहावा.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत विविध पदांच्या १९ जागा

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत कायदा/विधी अधिकारी (१ जागा), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (३ जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (३ जागा), सहाय्यक नगर रचनाकार (४ जागा), सुरक्षा अधिकारी (१ जागा), सिस्टीम मॅनेजर (ई-प्रशासन) (१ जागा), माहिती व जनसंपर्क अधिकारी (१ जागा), पर्यावरण संवर्धन अधिकारी (१ जागा), शाखा अभियंता (विद्युत) (१ जागा), कनिष्ठ अभियंता (विद्युत) (१ जागा), शाखा अभियंता (यांत्रिकी) (१ जागा), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (१ जागा) अशा एकूण १९ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी ५ ते २० जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.cmcchandrapur.com तसेच https://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर तसेच दै.लोकसत्ताच्या दिनांक ४ जानेवारी २०१७ च्या अंकात उपलब्ध आहे.

एसटी मध्ये महाव्यवस्थापक पदाच्या २ जागा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये (एसटी) महाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) (१ जागा), महाव्यवस्थापक (प्रकल्प) (१ जागा) अशी एकूण २ पदे सरळसेवेने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांच्या ७६ जागा

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नगरपरिषद सेवा नगर अभियंता / पर्यवेक्षक (१७ जागा), महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक अभियांत्रिकी सेवा (४ जागा), लेखापरिक्षण व लेखा सेवा सहायक लेखा पर्यवेक्षक/सहायक लेखापाल (२ जागा), अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक सेवा (६ जागा), कर निर्धारण व प्रशासकीय सेवा (३ जागा), लघुटंकलेखक (२ जागा), लिपीक टंकलेखक (४ जागा), स्वच्छता निरिक्षक (९ जागा), वाहनचालक कम ऑपरेटर (७ जागा), सहायक उद्यान पर्यवेक्षक (३ जागा), आरोग्य सहायक /नर्स (२ जागा), गाळणी चालक/प्रयोगशाळा सहायक (३ जागा), पंप ऑपरेटर (१ जागा), तारतंत्री (२ जागा), फायरमन (११ जागा) अशा एकूण ७६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वसई उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात पोलीस पाटील पदाची भरती

पालघर जिल्ह्यातील वसई उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात ‘पोलीस पाटील’ पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज http://formonline.net/vasaipp या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कृषी आयुक्तालयाच्या विविध विभागात कृषी सेवक पदाच्या 730 जागा

कृषी आयुक्तालच्या अधिनस्त विभागीय कार्यालयाअंतर्गत गट-क संवर्गातील कृषी सेवकांची पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पुणे - 156 पदे, ठाणे - 181 पदे, नाशिक - 31 पदे, कोल्हापूर - ८६ पदे, औरंगाबाद - १०७ पदे, लातूर - २२ पदे, अमरावती - ९ पदे, नागपूर - १३८ पदे अशी विभागनिहाय पदसंख्या आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १२ जानेवारी २०१६ आहे. अधिक माहिती www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

रोजगारासंदर्भात आता हेल्‍पलाईन

सर्वंकष ई- प्रशासन प्रणाली प्रकल्‍पांतर्गत विकसित केलेल्‍या www.maharojgar.gov.in या वेबपोर्टलव्‍दारे लाभार्थी घटक उमेदवार, नियोक्‍ते, प्रशिक्षण संस्‍था, शासनाची विविध कार्यालये, शासनाच्‍या स्‍वयंरोजगार योजना राबविणारी महामंडळे, सेवा पुरविणारे व सेवा घेणारे इ. लाभार्थी घटक यांना रोजगार, स्‍वयंरोजगार, व प्रशिक्षणाबाबतच्‍या विविध सेवा सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहे. सदर लाभार्थी घटकांना या सेवाचा लाभ घेताना काही अडचणी असल्‍यास त्‍यांचे निराकरण व त्‍यांना सहाय्य करण्‍यासाठी नविन हेल्‍पलाईन क्रमांक - 18602330133 दिनांक 27 ऑक्‍टोबर 2015 पासून सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्या वगळून) सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वित करण्‍यात आला आहे.

जिल्हा परिषद भंडारा यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या 74 जागा

जिल्हा परिषद भंडारा, यांच्या आस्थापनेवर आरोग्य सेवक पुरुष (हंगामी फवारणी कर्मचाऱ्यामधून) (4 जागा), आरोग्य सेवक (महिला) (10 जागा), पर्यवेक्षिका (अंगणवाडी सेविकेमधून) (2 जागा), विस्तार अधिकारी (कृषी) (1 जागा), ग्रामसेवक (कंत्राटी) (16 जागा), विस्तार अधिकारी (पंचायत) (1 जागा), स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक (बांधकाम) (1 जागा), पशुधन पर्यवेक्षक (5 जागा), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम) (17 जागा), कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) (2 जागा), परिचर (15 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहिती http://pixeltechservices.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, (WSSO) बेलापूर, नवी मुंबई येथे विविध पदाच्या 14 जागा

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, (WSSO) बेलापूर, नवी मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने संनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार (1 जागा), माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार (1 जागा), मन्युष्यबळ विकास सल्लागार (1 जागा), विभागीय समन्वयक (4 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), समन्वयक (पाणी गुणवत्ता) (1 जागा), अभियंत्रिकी सल्लागार (सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन) (1 जागा), अभियंत्रिकी सल्लागार (पाणी गुणवत्ता) (1 जागा), सहा. संनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार (1 जागा), सहा. मन्युष्यबळ विकास सल्लागार (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स 5 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://water.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या वतीने विविध पदाच्या 38 जागा

केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या वतीने प्राध्यापक (इकॉनॉमिकस) (1 जागा), सहाय्यक प्राध्यापक (सर्जरी) (10 जागा), सहाय्यक प्राध्यापक (पी.एम.आर) (9 जागा), सहाय्यक विधान मंडळ (कन्नड) (1 जागा), नाविक सर्व्हेअर- कम- उपसंचालक (साधारण) (तांत्रिक) (15 जागा), पशुधन अधिकारी (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 26 सप्टेंबर-2 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, मुंबई येथे वाहन चालक पदाच्या 7 जागा

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, मुंबई येथे वाहन चालक (7 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 30 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली येथे विविध पदाच्या जागा

जिल्हाधिकारी कार्यालय,गोंदिया येथे विविध पदाच्या 21 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील तलाठी (17 जागा) लिपीक टंकलेखक (4 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती http://parikshagondia2015.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय,भंडारा येथे तलाठी पदाच्या 22 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या आस्थापनेवरील तलाठी (22 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://collectorbhandara.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथे तलाठी पदाच्या 13 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील तलाठी (13 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली येथे तलाठी पदाच्या 6 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील तलाठी (6 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://gadchiroli.nic.in/nmresult.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे विविध पदाच्या 41 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील तलाठी (33 जागा), लिपीक-टंकलेखक (4 जागा), शिपाई-वाचमॅन (4 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://nandurbarexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासाठीतलाठी पदांच्या 19 जागा

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी महसूल व उपविभागाच्या आस्थापनेवर तलाठी पदाच्या (19) जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 2 सप्टेंबर 2015 असून अधिक माहितीसाठी www.collectorpalghar.in यावर संपर्क साधावा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने विविध पदाच्या 2 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने बृहन्मुंबई महानगरपालिका विभागात अधिष्ठाता, महापालिका वैद्यक संस्था, बृहन्मुंबई महानगरपालिका गट-अ (1 जागा) व उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उपसंचालक, व्यवयाय शिक्षण व प्रशिक्षण-नि-उपशिक्षणार्थी सल्लागार (वरिष्ठ), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे विविध पदाच्या 32 जागा

जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील तलाठी (32 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती nagarcollector2015.erecruitment.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कर्मचारी निवड आयोग यांच्यावतीने लघुलेखक पदाच्या 1064 जागा

कर्मचारी निवड आयोग यांच्यावतीने गट-क व ड या वर्गातील लघुलेखक (1064 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 ऑगस्ट 2014 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://sscregistration.nic.in/mainmenu2.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने अन्न सुरक्षा अधिकारी पदाच्या 48 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी (48 जागा) अन्न औषध प्रशासन गट-ब या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे प्रतिवेदक (कनिष्ठ) गट-अ पदाच्या 6 जागा

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे प्रतिवेदक (इंग्रजी) (कनिष्ठ) गट-अ (3 जागा), प्रतिवेदक (हिंदी) (कनिष्ठ) गट-अ (3 जागा), या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 24 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज