Employment News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Employment News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत विविध पदांच्या १९ जागा

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत कायदा/विधी अधिकारी (१ जागा), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (३ जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (३ जागा), सहाय्यक नगर रचनाकार (४ जागा), सुरक्षा अधिकारी (१ जागा), सिस्टीम मॅनेजर (ई-प्रशासन) (१ जागा), माहिती व जनसंपर्क अधिकारी (१ जागा), पर्यावरण संवर्धन अधिकारी (१ जागा), शाखा अभियंता (विद्युत) (१ जागा), कनिष्ठ अभियंता (विद्युत) (१ जागा), शाखा अभियंता (यांत्रिकी) (१ जागा), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (१ जागा) अशा एकूण १९ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी ५ ते २० जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.cmcchandrapur.com तसेच https://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर तसेच दै.लोकसत्ताच्या दिनांक ४ जानेवारी २०१७ च्या अंकात उपलब्ध आहे.

रोजगारासंदर्भात आता हेल्‍पलाईन

सर्वंकष ई- प्रशासन प्रणाली प्रकल्‍पांतर्गत विकसित केलेल्‍या www.maharojgar.gov.in या वेबपोर्टलव्‍दारे लाभार्थी घटक उमेदवार, नियोक्‍ते, प्रशिक्षण संस्‍था, शासनाची विविध कार्यालये, शासनाच्‍या स्‍वयंरोजगार योजना राबविणारी महामंडळे, सेवा पुरविणारे व सेवा घेणारे इ. लाभार्थी घटक यांना रोजगार, स्‍वयंरोजगार, व प्रशिक्षणाबाबतच्‍या विविध सेवा सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहे. सदर लाभार्थी घटकांना या सेवाचा लाभ घेताना काही अडचणी असल्‍यास त्‍यांचे निराकरण व त्‍यांना सहाय्य करण्‍यासाठी नविन हेल्‍पलाईन क्रमांक - 18602330133 दिनांक 27 ऑक्‍टोबर 2015 पासून सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्या वगळून) सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वित करण्‍यात आला आहे.

शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत विविध पदाच्या 54 जागा

आरोग्य सेवा संचालनालय, ‘प्रकल्प प्रेरणा’ शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पद्धतीने औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, अकोला, यवतमाळ व वाशिम या नऊ जिल्हांमध्ये प्रोग्राम ऑफिसर (मानसोपचार तज्ज्ञ) (9 जागा), चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ (9 जागा), मनोविकृती सामाजिक कार्यकता (9 जागा), मनोविकृती परिचारिका (9 जागा), सामाजिक परिचारिका (9 जागा), असिस्टंट (9 जागा) या पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन 15 ऑक्टोबर 2015 रोजी करण्यात आले आहे. सामाजिक परिचारिका व असिस्टंट या पदासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज 12 ऑक्टोबर 2015 पर्यंत करावा. मुलाखत संबंधीत जिल्ह्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयात होईल.

भारतीय वायू सेनेत एअरमन पदाची भरती

भारतीय वायू सेनेत पुरुष उमेदवारांना एअरमन पदाच्या भरतीसाठी आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी आंमत्रित करीत आहे. हा मेळावा शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे 17 ते 24 नोव्हेंबर 2015 या कालावधीत होणार आहे. त्यावेळी ग्रुप ‘एक्स’ यात एज्युकेशनल इन्स्ट्रक्टर-शिक्षण प्रशिक्षक या व्यवसायात (ट्रेड) एअरमन आणि ग्रुप ‘वाय’ (अ-तांत्रिक तसेच ऑटोमोबाइल टेक्निकल) व ग्राऊंड ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर आणि भारतीय वायू सेनेमध्ये पोलीस या व्यवसायांमध्ये एअरमन या पदासाठी होणाऱ्या भरतीमधून भारतीय वायू सेनेत सामीलोता येईल. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 7 ऑक्टोबर 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या वतीने विविध पदाच्या 38 जागा

केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या वतीने प्राध्यापक (इकॉनॉमिकस) (1 जागा), सहाय्यक प्राध्यापक (सर्जरी) (10 जागा), सहाय्यक प्राध्यापक (पी.एम.आर) (9 जागा), सहाय्यक विधान मंडळ (कन्नड) (1 जागा), नाविक सर्व्हेअर- कम- उपसंचालक (साधारण) (तांत्रिक) (15 जागा), पशुधन अधिकारी (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 26 सप्टेंबर-2 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विजया बँक, बंगळुरु येथे विविध पदाच्या 36 जागा

विजया बँक, बंगळुरु येथे व्यवस्थापक (सुरक्षा) (24 जागा), व्यवस्थापक (राजभाषा) (12 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 5-11 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.vijayabank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कर्मचारी निवड आयोग यांच्यावतीने लघुलेखक पदाच्या 1064 जागा

कर्मचारी निवड आयोग यांच्यावतीने गट-क व ड या वर्गातील लघुलेखक (1064 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 ऑगस्ट 2014 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://sscregistration.nic.in/mainmenu2.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कर्मचारी निवड आयोग यांच्यावतीने कनिष्ठ अभियंता पदाच्या 1000 जागा

कर्मचारी निवड आयोग यांच्यावतीने कनिष्ठ अभियंता (1000 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 11-17 जुलै 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती ssconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज