Army लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Army लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सशस्त्र सीमा दलात विविध पदांच्या ८७२ जागा

केंद्रीय गृह विभागाअंतर्गत सशस्त्र सीमा दलात उप-निरीक्षक (समन्वय) (१६ जागा), सहाय्यक उप-निरीक्षक (समन्वय) (११० जागा), मुख्य कॉन्स्टेबल (समन्वय) (७४६ जागा) अशा एकूण ८७२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात पसिद्ध झाल्यापासून ३० दिवस आहे. अधिक माहितीसाठी दि. ३१ डिसेंबर २०१६ ते ६ जानेवारी २०१७ च्या एम्प्लॉयमेंट न्यूज पहावा.

भंडारा येथे 6 जानेवारीला सैन्‍य भर्ती

भंडारा येथे आर्मीची दिनांक 6 जानेवारी 2016 रोजी सैन्‍य भरती आयोजित केली आहे. अधिक माहितीसाठी जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालय, वर्धा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

मराठा लाईट रेजिंमेन्‍ट सेन्‍टरमध्‍ये सैन्‍य भरती

मराठा लाईट रेजिमेन्‍ट येथे युनिट हेडक्‍वॉर्टर्स कोटा साठीची भर्ती दिनांक 30 नोंव्‍हेबर ते 3 डिसेंबर 2015 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालय, वर्धा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

राष्ट्रीय संरक्षण अॅकडमीमध्ये (एनडीए) विविध अभ्यासक्रमाच्या 375 जागा

केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण अॅकडमीमध्ये (एनडीए) विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्थलसेना (208), नौसेना (42), वायूसेना (70) आणि कॅडेट एन्ट्री स्किमसाठी (55) अशा एकूण 375 जागांसाठी सामुदायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2015 आहे. अधिक माहितीसाठी www.upsc.gov.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.

उस्मानाबाद येथे 8 ते 18 एप्रिल पर्यंत पाच जिल्ह्यांसाठी सैन्यभरती मेळावा

उस्मानाबाद येथे सैन्यभरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, पुणे या पाच जिल्ह्यांसाठी हा मेळावा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घेण्यात येत आहे. दि. 8 एप्रिल रोजी पुणे, 9 एप्रिल रोजी लातूर, दि. 10 व 11 एप्रिल रोजी उस्मानाबाद, दि. 12, 13 व 14 एप्रिल रोजी अहमदनगर, दि 15, 16 व 17 एप्रिल रोजी बीड, दि. 18 एप्रिल रोजी माजी सैनिकांचे पाल्य, युद्ध विधवांचे पाल्य आदींच्या साठी सैन्य भरती प्रक्रिया होईल. या मेळाव्यात जवान (जनरल ड्युटी), जवान (तांत्रिक), जवान (क्लर्क/एसकेटी), जवान (नर्सिंग असिस्टंट) आणि जवान (ट्रेडसमन) ही पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी या सैन्यभरती मेळाव्यास उपस्थित रहावे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज