उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीकरिता अर्ज
अनुसूचित
जातीच्या 100 विद्यार्थ्यांना सन 2015-16 या वर्षात देशातील नामांकित
शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज
गुणवत्ता शिष्यवृत्तीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या 100
विद्यार्थ्यांमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी 80 विद्यार्थ्यी व पदव्युत्तर
पदवी/पदवीका अभ्यासक्रमासाठी 16 विद्यार्थ्यी आणि 4 विद्यार्थ्यांचा
राजस्तरीय पदव्युत्तर पदवी/पदवीका अभ्यासक्रमासाठी समावेश असेल. या
शिष्यवृत्तीसाठी विहित नमुन्यातील अर्ज 31 ऑगस्ट 2015 पर्यंत आयुक्त समाज कल्याण, पुणे यांच्याकडे पाठवावा. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर रोजगार कॉलम मध्ये उपलब्ध आहे.