महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2015

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागातील सहायक अभियंता, गट-अ व सहायक अभियंता, गट-ब, श्रेणी-२ या पदाच्या भरतीसाठी दि. 25 ऑक्टोबर 2015 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-2015 च्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2015 दि. 9 व 10 जानेवारी 2016 रोजी घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारास ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 डिसेंबर 2015 आहे. अधिक माहिती https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज