सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये अभियंता पदाच्या ५४ जागा

सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम (CRIS) मध्ये ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर (४० जागा), ज्युनिअर नेटवर्क इंजिनीअर (१४ जागा) अशा एकूण ५४ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.cris.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात पर्यवेक्षकीय पदांच्या ४८३ जागा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात सहाय्यक वाहतूक अधिक्षक (कनिष्ठ) (२५ जागा), वाहतूक निरीक्षक (कनिष्ठ) (१४८ जागा), लेखाकार (कनिष्ठ) (६३ जागा), भांडार पर्यवेक्षक (कनिष्ठ) (२ जागा), भांडारपाल (कनिष्ठ) (४० जागा), सुरक्षा निरीक्षक (कनिष्ठ) (१२ जागा), सहा.सुरक्षा निरीक्षक (कनिष्ठ) (२२ जागा), आगरक्षक (कनिष्ठ) (१ जागा), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)(कनिष्ठ) (४६ जागा), कनिष्ठ अभियंता (विद्युत)(कनिष्ठ) (७ जागा), सहा.कार्य.अधिक्षक (कनिष्ठ)/तांत्रिक सहाय्यक (कनिष्ठ) (९२ जागा), प्रभारक कनिष्ठ (१० जागा), वरिष्ठ संगणित्र चालक (कनिष्ठ)/विभागीय संगणक पर्यवेक्षक (क.) (१५ जागा) अशा एकूण ४८३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधीत १२ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१७ आहे. अधिक माहिती https://msrtc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेडमध्ये कार्यकारी सहाय्यक पदाची जागा

इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेडमध्ये कार्यकारी सहाय्यक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.irel.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध पदांच्या १४२५३ जागा

महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळात चालक तथा वाहक (कनिष्ठ) (७९२९ जागा), लिपीक-टंकलेखक (कनिष्ठ) (२५४८ जागा), सहाय्यक (कनिष्ठ) (३२९३ जागा), पर्यवेक्षकीय (कनिष्ठ) (४८३ जागा) अशा एकूण १४२५३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ जानेवारी २०१७ पासून सुरु होणार असून अधिक माहिती महामंडळाच्या www.msrtc.gov.inmsrtcexam.in या संकेतस्थळावर दि.७ जानेवारी २०१७ पासून उपलब्ध होईल. तसेच अधिक माहितीसाठी दै.लोकमतचा दि. ५ जानेवारी २०१७ रोजीचा अंक पहावा.

सशस्त्र सीमा दलात विविध पदांच्या ८७२ जागा

केंद्रीय गृह विभागाअंतर्गत सशस्त्र सीमा दलात उप-निरीक्षक (समन्वय) (१६ जागा), सहाय्यक उप-निरीक्षक (समन्वय) (११० जागा), मुख्य कॉन्स्टेबल (समन्वय) (७४६ जागा) अशा एकूण ८७२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात पसिद्ध झाल्यापासून ३० दिवस आहे. अधिक माहितीसाठी दि. ३१ डिसेंबर २०१६ ते ६ जानेवारी २०१७ च्या एम्प्लॉयमेंट न्यूज पहावा.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेण्टल रिसर्चमध्ये विविध पदांच्या ३ जागा

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेण्टल रिसर्चमध्ये प्रशासकीय अधिकारी (१ जागा), प्रशासकीय सहाय्यक (१ जागा), कनिष्ठ हिंदी भाषांतरकार (१ जागा) अशा एकूण ३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २२ दिवस आहे. अधिक माहिती http://www.tifr.res.in/positions या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत विविध पदांच्या १९ जागा

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत कायदा/विधी अधिकारी (१ जागा), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (३ जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (३ जागा), सहाय्यक नगर रचनाकार (४ जागा), सुरक्षा अधिकारी (१ जागा), सिस्टीम मॅनेजर (ई-प्रशासन) (१ जागा), माहिती व जनसंपर्क अधिकारी (१ जागा), पर्यावरण संवर्धन अधिकारी (१ जागा), शाखा अभियंता (विद्युत) (१ जागा), कनिष्ठ अभियंता (विद्युत) (१ जागा), शाखा अभियंता (यांत्रिकी) (१ जागा), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (१ जागा) अशा एकूण १९ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी ५ ते २० जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.cmcchandrapur.com तसेच https://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर तसेच दै.लोकसत्ताच्या दिनांक ४ जानेवारी २०१७ च्या अंकात उपलब्ध आहे.

एसटी मध्ये महाव्यवस्थापक पदाच्या २ जागा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये (एसटी) महाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) (१ जागा), महाव्यवस्थापक (प्रकल्प) (१ जागा) अशी एकूण २ पदे सरळसेवेने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एमएससी बँकेत अधिकारी पदाच्या ३५ जागा

दी महाराष्ट्र स्टेट कॉ-ऑपरेटीव्ही बँक लिमिटेड मध्ये व्यवस्थापक (५ जागा), सह व्यवस्थापक ( ५ जागा), सहाय्यक व्यवस्थापक (७ जागा), अधिकारी वर्ग-II ( ५ जागा), कनिष्ठ अधिकारी ( १३ जागा) अशा एकूण जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.mscbank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांच्या ७६ जागा

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नगरपरिषद सेवा नगर अभियंता / पर्यवेक्षक (१७ जागा), महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक अभियांत्रिकी सेवा (४ जागा), लेखापरिक्षण व लेखा सेवा सहायक लेखा पर्यवेक्षक/सहायक लेखापाल (२ जागा), अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक सेवा (६ जागा), कर निर्धारण व प्रशासकीय सेवा (३ जागा), लघुटंकलेखक (२ जागा), लिपीक टंकलेखक (४ जागा), स्वच्छता निरिक्षक (९ जागा), वाहनचालक कम ऑपरेटर (७ जागा), सहायक उद्यान पर्यवेक्षक (३ जागा), आरोग्य सहायक /नर्स (२ जागा), गाळणी चालक/प्रयोगशाळा सहायक (३ जागा), पंप ऑपरेटर (१ जागा), तारतंत्री (२ जागा), फायरमन (११ जागा) अशा एकूण ७६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महापारेषणमध्ये निम्नस्तर लिपीक (लेखा) पदाच्या ६२ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत निम्नस्तर लिपीक (लेखा) पदासाठी पुणे झोन (८ जागा), नाशिक झोन (९ जागा), नागपूर झोन (९ जागा), कऱ्हाड झोन (१२ जागा), औरंगाबाद झोन (८ जागा), अमरावती झोन (४ जागा), वाशी झोन (१० जागा), कॉर्पोरेट ऑफिस (२ जागा) अशा एकूण ६२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती www.mahatransco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महापारेषणमध्ये इंजिनिअर पदाच्या २८१ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत डेप्युटी एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर (सिव्हील) (१८ जागा), असिस्टंट इंजिनिअर (ट्रान्स) (१६८ जागा), असिस्टंट इंजिनिअर (टेलिकॉम) (२५ जागा), असिस्टंट इंजिनिअर (सिव्हील) (७० जागा) अशा एकूण २८१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती www.mahatransco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज